अमेरिकेत पहिले पिझा एटीएम सुरू

pizza
एटीएममधून पैसे काढणे आता सर्वसामान्यांच्याही सरावाचे झाले आहे. तसेच व्हेंडींग मशीन्समधून जीवनावश्यक वस्तू घेणेही अनेकांच्या अंगवळणी पडले आहे. मात्र गरमागरम पिझा कधीही, कोणत्याही वेळी मिळण्याची सुविधाही आता नव्या तंत्रज्ञानाने उपलब्ध झाली असून पिझा प्रेमींसाठी ही फारच खास बातमी आहे.

जगातले पहिले पिझा एटीएम अमेरिकेच्या ओहियो प्रांतातील झेविअर युनिव्हर्सिटी कँपसमध्ये १० ऑगस्टपासून कार्यरत होत आहे. येथे २४ तास कधीही गरमागरम व तुमच्या आवडीचा पिझा मिळू शकणार आहे. या मशीनमधून १२ इंची गरम व ताजा पिझा ऑर्डर देताच ३ मिनिटांच्या आत मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकाला टचस्क्रीनचा वापर करून मनपसंत पिझाची ऑर्डर द्यावी लागेल. त्याचे पैसे क्रेडीट अथवा डेबिट कार्डवरही देता येणार आहेत. एका पिझासाठी १० डॉलर्स मोजावे लागतील. या मशीनमध्ये तापमान नियंत्रक सिस्टीम बसविली गेली असून त्यामुळे पिझा ताजा व गरम राहण्यास मदत मिळणार आहे.

Leave a Comment