बाजारात दाखल झाला झेनचा सिनेमॅक्स ३

zen
मुंबई : आपला ‘सिनेमॅक्स ३’ हा नवा स्मार्टफोन झेन कंपनीने बाजारात आणला असून सँडस्टोन फिनीशसोबत काळ्या रंगातील या फोनची किंमत ५४९९ आहे. या फोनची विक्री रिटेल स्टोअर आणि ई-कॉमर्स साईट्सवर सुरू आहे.

४९९ रूपयांमध्ये प्रोटेक्शन कीट या मोबाईलसह मिळणार आहे, ज्यात स्क्रीन गार्डसोबतच प्रोटेक्टिव्ह केसही दिली जाणार आहे. हा फोन अॅक्वा फिश, कार्बन ऑरा पॉवरसारख्या स्मार्टफोनना टक्कर देणार आहे.

सिनेमॅक्स ३मध्ये ५.५ FWVA IPS डिस्प्ले देण्यात आला असून १.३ GHz क्वाड कोअर प्रोसेसर तसेच २ जीबी रॅम त्याचबरोबर १६जीबीची इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. यात फोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा रिअर आणि ३.२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात ३ जी, ब्लूटूथ आणि वायफाय अशा कनेक्टिविटी देखील देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment