निस्सान मोटर्सने त्यांची तीन सीटर इलेक्ट्रीक कॉन्सेप्ट कार ब्राझीलमध्ये नुकतीच प्रदर्शित केली असून ती प्रत्यक्षात बाजारात येण्यास अजून तीन वर्षे लागतील असे समजते.
निस्सानची ब्लेडग्लायडर कॉन्सेप्ट कार
अतिशय आकर्षक आणि पारंपारिक डिझाईनपेक्षाही खूपच वेगळी अशी ही कार वजनाला १३०० किलो आहे. या कारमधील बॅटरी दोन इलेक्ट्रीक मोटर्सना पॉवर पुरविते. या दोन्ही मोटर्स कारच्या मागच्या चाकांना जोडलेल्या आहेत. कारची रूंदी चांगली आहे. व ही कार नेहमीच्या पारंपारिक कारपेक्षा वेगळी आहे कारण तिला नॅरो फ्रंट व डेल्टाईड शेप दिला गेला आहे. ० ते १०० किमीचा वेग ती ५ सेकंदात घेते व तिचा टॉप स्पीड आहे ताशी १९० किमी.
इंटिरिअरमध्ये कारला फ्रॅब्रिक सीट दिल्या गेल्या आहेत. डॅशबोर्डवर ४ स्क्रीन असून त्यातील दोन स्टीअरिंग व्हीलच्या दोन बाजूंना एक स्टीअरिंग व्हीलवरच व चौथा सेंटरमध्ये आहे. यात ड्रायव्हरसीटच्या मागे दोन प्रवासी बसू शकतात. दार उघडताच ड्रायव्हर सीट आपोआप बाजूला सरकते व मागचे प्रवासी सहजपणे आत शिरू शकतात.