तब्बल ७७४ जागांसाठी मुंबई अग्निशमन दलामध्ये भरती

bmc
मुंबई : राज्यातील अनेक यूवक चांगले शिक्षण असूनही नोकरीसाठी अनेकांचे उंबरे झिजवत आहेत. परंतू, ज्यांना नोकरी करायची आहे, अशा मंडळींसाठी एक सुवर्णसंधी चालून आली असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये तब्बल ७७४ जागांसाठी भरती होणार आहे.

या मध्ये राज्यातील अनेक युवक या नोकरीसाठी असणारे नियम व अटी सहज बसू शकतात. ही नोकरी मिळविण्यासाठी तूम्हाला, १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत १२वी मध्ये तुम्हाला किमान ५० टक्क्यांहून अधिक मार्क असायला हवेत. महत्वाचे म्हणजे शालांन्त प्रमाणपत्र परीक्षेत (१२वी बोर्डाची परीक्षा) उमेदवार १०० मार्कांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन पास असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याबाबत किंवा अर्जाचा नमुना आणि इतर माहितीसाठी मुंबई महापालिकेच्या http://www.mcgm.gov.in/ या संकेतस्थळाला आपण भेट देऊ शकता.