ग्रीन बँक शहर घेतेय परग्रहवासियांच्या आवाजांचा वेध

elian
अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया भागातील ग्रीन बँक हे जगातील सर्वात शांत शहर ठरले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथे मोबाईल व वायफायला पूर्ण बंदी आहे आणि या भागाची लोकसंख्या आहे अवघी १४३. या शहरात गेले की एकदम १९५० च्या दशकातील एखाद्या शहरात गेल्याचा फिल येतो. मात्र शांत शहर एवढेच याचे वैशिष्ठ नाही तर येथे अहोरात्र परग्रहवासियांकडून कांही आवाज येताहेत का याचा वेध घेतला जातो.

या शहरातील नागरिकांचे त्यांच्या गावावर अतोनात प्रेम आहे आणि ते आपल्या गावाला ओअॅसिस असे संबोधतात. येथील नागरिकांच्या मते जगभरात आज प्रत्येकजण मोबाईलच्या आधीन झाले आहेत आणि हे अजिबात योग्य नाही. या गावात जगातील सर्वात मोठी द रोबर्ट सी बायर्ड ग्रीन बँक टेलिस्कोप बसविली गेली आहे. ७७ लाख किलो वजनाची ही दुर्बिण दोन एकराच्या परिसरात आहे आणि तिची उंची आहे ४५८ फूट. या उंच दुर्बिणीतून अंतराळातून येणारे आवाज नोंदविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातूनच परग्रहवासियांचा शोध लागण्याची अपेक्षा येथील संशोधकांना आहे. मोबाईल,इंटरनेटमुळे या शोधात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांवर येथे बंदीच आहे.

या गावात थोडी जरी गडबड झाली तरी सगळे संशोधन वाया जाईल या भीतीने एक गाडी शहरभर सातत्याने फिरत असते. कुठेही थोडा जरी आवाज येतोय असे वाटले तर त्याचा बंदोबस्त ही गाडी करते.

Leave a Comment