एकाचवेळी नाचले हजार रोबो- बनले गिनिज रेकॉर्ड

dancing-robots
चीनमध्ये एकाचवेळी मोठ्या संख्येने नाचून रोबोंनी गिनिज बुक मध्ये आपल्या विक्रमाची नोंद केली. क्विगदाओ बिअर फेस्टीव्हलमध्ये १००७ रोबो एकाचवेळी नाचले आणि हे सर्व रोबो एकाच मोबाईलवरून नियंत्रित केले गेले होते. यापूर्वी चीनी कंपनी युबिटेक रोबो कार्पोरेशनने ५४० डान्सिंग रोबोचा विक्रम नोंदविला होता.

क्विगदोओ फेस्टीव्हलमध्ये ४३. ८ सेंमी उंचीचे हजारांहून अधिक रोबो डान्सिंग स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातील कांही रोबो नाचताना पडले तर कांही नाचलेच नाहीत. जे नाचले नाहीत अथवा पडले त्यांना स्पर्धेतून बाद केल्यानंतरही १००७ रोबोंनी सुमारे ६० सेकंदांचे नृत्य पूर्ण केल्याचे लक्षात आले व नवे रेकॉर्ड नोंदले गेले.

Leave a Comment