पतंजली आयुर्वेदने मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातल्या पिथमपूर औद्योगिक वसाहतीत अन्नप्रक्रिया उद्योगात ५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मध्यप्रदेश सरकारने या औद्योगिक वसाहतीत पतंजलीला ४०० एकर जमीन उपलब्ध करून दिली असून त्यासाठी पतंजलीने १ कोटी रूपये अॅडव्हान्स दिल्याचेही समजते. या युनिटमुळे ७०० ते ८०० जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे.
पतंजलीची मध्यप्रदेशात ५०० कोटींची गुंतवणूक
वास्तविक महाराष्ट्र शासनानेही नागपूर येथे पंतजलीच्या प्रकल्पासाठी जमीन देऊ केली होती मात्र मध्यप्रदेश सरकारने अगोदरच पतंजलीला निमंत्रित केल्याने हा उद्योग मध्यप्रदेशात गेला असेही समजते. मध्यप्रदेश सरकारने त्यांना करसवलतीही दिल्या आहेत. या प्रकल्पात येत्या ३ वर्षात उत्पादन सुरू होणार आहे असे सांगितले जात आहे.