कूलपॅडचा मेगा सेल्फी स्मार्टफोन

coolpad
कूलपॅड या चीनी मोबाईल उत्पादक कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन १० ऑगस्टला भारतात लॉच केला जात असल्याचे जाहीर केले आहे. हा फोन सेल्फी फोकस्ड असल्याची जाहिरात केली गेली असून या संदर्भात प्रसारमाध्यमांकडे आलेल्या निमंत्रणात फोनचे नांव अथवा किंमत गुप्त ठेवली गेली आहे.

निमंत्रणपत्रिकेत छापण्यात आलेल्या फोटोंवरून हा ८एमपीचा फ्रंट कॅमेरा फ्लॅशलाईट सपोर्ट व एफ/२.० ८३ डिग्री वाईड अँगल लॅन्ससह असेल. त्याला १६ एमपीचा सेल्फी सेन्सर अथवा ड्युअल लेन्स कॅमेरा दिला जाईल असाही अंदाज वर्तविला जात आहे. अन्य फिचर्समध्ये ५.५ इंची डिस्प्ले. १३एमपी चा रियर कॅमेरा,४ जीबी रॅम, तसेच एचडी आर्म, एडिटिंग टूल, झिप सपोर्ट व एचडी व्हीडीओ रेकॉर्डिग फिचर असेल.

Leave a Comment