केवळ कारमध्ये बसण्यासाठी दर तासाला १३०० रूपयांप्रमाणे भत्ता मिळविण्याची संधी गुगलने देऊ केली आहे. मात्र ती फक्त अॅरिझोनातील पदवीधरांनाच मिळू शकणार आहे. याचे कारण म्हणजे गुगल त्यांच्या सेल्फड्रीव्हन कारच्या चाचण्या या भागात घेत आहे. त्यासाठी त्यांनी पदवीधरांकडून अर्ज मागविले आहेत. काम इतकेच की निवड झालेल्या उमेदवारांनी या कारमध्ये बसायचे आणि तासाला २० डॉलर्स प्रमाणे मेहनताना घ्यायचा. कामाचे तास आहेत ६ किवा ८. म्हणजे आठ तास काम केले तर महिन्याला ३ लाख रूपये पगार.
कारमध्ये बसा आणि महिना ३ लाख कमवा
अर्थात त्यासाठी कांही अटी आहेत. म्हणजे इच्छुक उमेदवार पदवीधर हवा तसेच त्याचे कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड असता कामा नये. प्रतिमिनिट ४० शब्द या वेगाने टायपिंग करता यायला हवे व निवड झाल्यास १२ ते २४ महिन्यांचा करार त्याला करावा लागेल. ही कार आपोआप चालणारीच आहे पण समजा मध्येच कांही गडबड झाली तर सीटवर बसलेल्या या उमेदवाराने कार सांभाळायची आहे. प्रत्येक सेशनचा लिखित व तोंडी फिडबॅक कंपनीला द्यायचा आहे. त्यानुसार कारमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत.
गुगल त्यांचा सेल्फ ड्रायव्हिंग ट्रकही या वर्षअखेर अमेरिकेत वापरात आणणार आहे.