अतिवेगवान मॅग्लेव्ह ट्रेन भारतातही धावणार

maglev
बुलेट ट्रेन पेक्षाही वेगवान अशा मॅग्लेव्ह तंत्रज्ञानावर आधरित मॅग्लेव्ह रेल्वे भारतातही लवकरच धावण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेने अशा ट्रेन साठी परदेशी कंपन्यांना आमंत्रित केले असल्याचे समजते. या ट्रेन चा वेग ताशी किमान ३५० किमी आहे. सध्या अशा रेल्वे जपान, चीन व जर्मनीत धावत आहेत.

भारतीय रेल्वेने अशा गाड्या चालविण्यासाठी चेन्नई बंगलोर, नागपूर मुंबई, हैद्राबाद चेन्नई व नवी दिल्ली चंदिगड या मार्गांची निवड केली गेली आहे. हा प्रकल्प खासगी सार्वजनिक सहयोगातून आकारास येणार आहे. जपानमध्ये २४ एप्रिलला धावलेल्या मॅग्लेव्ह ट्रेन ने ताशी ६०३ किमी वेगाचे रेकॉर्ड ट्रायल रनमध्ये नोंदविले आहे. सध्या जगात सर्वात वेगवान कमर्शियल मॅग्लेव्ह ट्रेन चीनमध्ये चालविली जात असून तिचा वेग आहे ताशी ४३१ किमी. ही ट्रेन शांघाय ट्रेन म्हणून ओळखली जाते.

Leave a Comment