१ मे पासून मुंबईत १२०० ठिकाणी वाय-फाय सुविधा

cm
मुंबई – आता इंटरनेट पॅकवर मुंबईकरांना जास्त पैसे खर्च करण्याची गरज लागणार नाही. कारण, मुंबई शहराला १ मे २०१७ पर्यंत ‘वायफाय’ शहर करण्याचा ध्यास देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे.

संपूर्ण मुंबईला १ मे २०१७ पर्यंत वाय-फाय हॉटस्पॉट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी १२०० ‘हॉटस्पॉट’ बसविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुंबई शहराच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मुंबई शहरामध्ये सीसीटीव्हीचे जाळे पसरविण्याचा उपक्रम राबविला होता. यानंतर आता मुंबईत १२०० ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट तयार करण्यात येणार आहेत. १२०० पैकी ५०० वायफाय हॉटस्पॉट १ नोव्हेंबरपर्यंत उलब्ध होतील असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्य सरकारने मुंबईकरांना खुष करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी ‘वायफाय’ सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुढील वर्षी होणा-या मनपा निवडणुका लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

Leave a Comment