कॉलड्राॅप झाल्यास व्होडाफोन देणार मोफत टॉकटाईम

vodafon
व्होडाफोनने त्यांच्या युजरसाठी व्होडाफोन नेटवर्कमध्ये कॉल ड्राॅप झाल्यास युजरला १० मिनिटांचा टॉकटाईम मोफत देण्याची घोषणा केली आहे. प्रीपेड युजरना हा वेळ पुढच्या दिवसाच्या मध्यरात्रीपर्यंत वापरता येणार आहे तर पोस्टपेड ग्राहकांना बिलींग सायकलमध्ये तो अॅड करून मिळणार आहे. अर्थात यासाठी केलेला फोन व्होडाफोन ते व्होडाफोन लोकल कॉल असला पाहिजे अशी अटही आहे. तसेच युजरला ही सुविधा महिन्यातून एकदाच मिळणार आहे. त्यासाठी युजरला बेटर हे स्पेलिंग टाईप करून १९९ नंबरवर पाठवावे लागेल.

व्होडाफोन इंडियाचे मार्केटिंग प्रमुख संदीप कटारिया म्हणाले आमचे नेटवर्क चांगलेच आहे पण तरीही युजरचे सर्व कॉल आमच्यासाठी सारख्याच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे युजरला कोणतीही अडचण येऊ नये याची दक्षता घेतली जाते. असा त्रास होत असेल तर त्याची भरपाई युजरला मिळाली पाहिजे असा यामागचा विचार आहे. तज्ञांच्या मते ही सोय म्हणजे नेटवर्कमध्ये सुधारणा करण्यासाठीची युक्ती आहे. असा कॉल युजरकडून आला तर कंपनीला कोणत्या एरियात नेटवर्क प्रॉब्लेम आहे ते कळू शकेल व तेथील नेटवर्क सुधारणचे उपाय योजता येतील.

Leave a Comment