आसूसची झेनफोन सिरीज भारतात येणार

zen
आसूस दिल्लीत १७ ऑगस्ट रोजी करत असलेल्या इव्हेंटमध्ये झेनफोन सिरीजमधील स्मार्टफोन सादर करणार असल्याचे समजते. या कार्यक्रमाची निमंत्रणे प्रसारमाध्यमांना पाठविली गेली आहेत. त्यात झेनफोन लाँच करणार असल्याचा स्पष्ट उल्लेख केला गेलेला नाही तरीही ही झेनफोन सिरीजच असेल अशी खात्री व्यक्त केली जात आहे. कंपनीचे मार्केट सीईओ जेरी शेन हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत.

आसूसचा नवा झेनफोन थ्री डिलक्स हा नवा फ्लॅगशीप स्मार्टफोन असून त्याला हलकी अॅल्युमिनियम अॅलॉय बॉडी, ५.७ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले, ६ जीबी रॅम, २३ एमपीचा रियर कॅमेरा, १२८ जीबी इंटरनल मेमरी, क्विक चार्ज ३.० सपोर्ट, यूएसबी टाईप सी पोर्ट, इनबिल्ट फिंगरप्रिंट सेन्सर दिले गेले आहे. या फोनची किंमत ३४ हजार पर्यंत असेल असे समजते. झेनफोन ३ हा बजेट स्मार्टफोन असून त्याला ५.५ इंची फुल एचडी डिस्प्ले, ४ जीबी रॅम, १६ एमपीचा रिअर कॅमेरा, फिंगरप्रिट सेन्सर व ३२ जीबी इंटरनल मेमरी आहे. त्याची किंमत साधारण १७ हजार रूपयांच्या आसपास असेल.

झेनफोन अल्ट्रा साठी ६.८ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, मल्टीमिडीया प्रेमींसाठी एक्झ्लुझिव्ह टूटू लाईफ हायएंड ४ के यूएचडीटिव्ही ग्रेडचे व्हिडीओ तंत्रज्ञान दिले गेले आहे. या फोनचे स्पीकरही खास आहेत. त्याला ४ जीबी रॅम व २३ एमपीचा रियर कॅमेराही आहे. याची इंटरनल मेमेरी आहे ६४ जीबी. हे सर्व फोन अँड्राईड ओएसचे आहेत.

Leave a Comment