लवकरच रेनो क्विडचे नवे मॉडेल

kwid
नवी दिल्ली : याच महिन्यामध्ये आपल्या नव्या लहान क्विड कारचे नवे मॉडेल फ्रान्सची वाहन निर्माता कंपनी रेनो लाँच करणार आहे. एक लिटरचे पेट्रोल इंजिन या वाहनामध्ये देण्यात येणार आहे.

क्विड ८०० सीसीचे इंजिन असलेली कार सध्या बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबत रेनो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित साहनी यांनी सांगितले, की भारतीय बाजारात क्विड मॉडेल लोकप्रिय असल्यामुळे कंपनी लवकरच आपली नवी एक लिटर इंजिन असणारे मॉडेल लाँच करणार आहे. आतापर्यंत ७५ हजार क्विड कारची विक्री करण्यात आले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ही नवी एक लिटरचे इंजिन असणारी क्विड कार लवकरच लाँच करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.