या व्यक्तीला ‘पोकेमॉन’ घडविणार मोफत जगाची सफर

pokemon
वॉशिंग्टन – सध्या जगभर ‘पोकेमॉन गो’चा फिव्हर चढला आहे. एकीकडे या गेममुळे नवनवीन समस्या निर्माण होत आहेत तर दुसरीकडे या गेममुळे काहींचा फायदा देखील होत आहे. मात्र अमेरिकेतील एका व्यक्तीला पोकेमॉन गोमुळे चक्क लॉटरीच लागली आहे. पोकेमॉन गो खेळता खेळता या व्यक्तीला मोफत जगाची सफर करण्याची संधी मिळाली आहे.

पोकेमॉन गो खेळताना निक जॉन्सन याने अमेरिकेतील सर्व पोकेमॉन पकडले आहेत. या गेममध्ये एकूण १५१ मॉन्‍सटर्स आहेत. जॉन्सनने त्यातील १४२ पोकेमॉन अमेरिकेत पकडले आहेत आणि उरलेले ६ पोकेमॉन जगभरात विखुरलेले आहेत. आता ते ६ पोकेमॉन पकडण्यासाठी मेरियट रिवॉर्ड्स आणि एक्‍सपेडिया यांनी त्याला जगाची सफर करून ते पोकेमॉन पकडण्याची संधी दिली आहे. यादरम्यान जॉन्सन सर्वात प्रथम पॅरिस, त्यानंतर हॉंगकॉंग, सिडनी आणि टोकियोत आपला विजयोत्सव साजरा करणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *