या माणसाला दत्तक हवी आई

adopt
आजपर्यंत विनापत्य अथवा दयाळू लोक दत्तक अपत्ये घेतात असा सार्वत्रिक समज होता पण चीनमधील एका माणसाला आई दत्तक हवी आहे. त्यासाठी तो १ लाख ६२ हजार अमेरिकन डॉलर्स मोजायला तयार आहे. ही रक्कम रूपयांत होते साधारण ९७ लाख. या माणसाने तशी जाहिरातच दिली आहे मात्र त्याची आई होऊ इच्छिणार्‍या महिलांसाठी त्याने अटींची यादीही सोबत दिली आहे.

या जाहिरातीनुसार या ३२ वर्षीय चिनी युवकाला किमान ५७ वर्षांची, सुशिक्षित, कोणतेही व्यसन नसलेली, सुशील, परदेशी प्रवासाचा अनुभव असलेली व सभ्य महिला आई म्हणून हवी आहे. तो त्याच्या फोनवरूनही त्या संदर्भातली माहिती देत आहे असे समजते.