महागल्या ह्युंडाईच्या कार

hyundai
नवी दिल्ली – आपल्या निवडक कारच्या किमतीत मारुती सुझुकीने वाढ केल्यानंतर देशातील दुस-या क्रमांकाची कार कंपनी ह्युंडाईने देखील आपल्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने निवडक प्रकारातील विभिन्न मॉडेल्सच्या दरात २० हजारापर्यंत वाढ केली. १६ ऑगस्टपासून नवीन किमती लागू होतील. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने ही वाढ करण्यात आल्याचे ह्युंडाई मोटार इंडियाच्या विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले. याव्यतिरिक्त डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने या किमती वाढविण्यात आल्यात. तीन हजार ते २० हजार रुपयांपर्यंत गाडय़ांच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत.

Leave a Comment