बग शोधणार्‍यांना अॅपल देणार २ लाख डॉलर्स

bug
अॅपलच्या उत्पादनांतील सुरक्षा यंत्रणेतला धोकादायक बग शोधणार्‍यांसाठी कंपनीने बक्षीस योजना जाहीर केली असून असा बग शोधणार्‍याला २ लाख डॉलर्स दिले जाणार आहेत. बग शोधण्यासाठी दिली गेलेली ही आत्तापर्यंतच सर्वात मोठी रक्कम आहे. आयफोन व आयपॅड ही जगातील लोकप्रिय उत्पादने हॅक न होणारी म्हणून प्रसिद्ध आहेत. कारण हॅकरना त्यांची सुरक्षा भेदणे खूपच अवघड आहे. अॅपलपूर्वी मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, टेस्ला मोटर्स अशा अनेक कंपन्यां नियमितपणे अशी बक्षीसे जाहीर करत आहेत.

ब्लॅक हॅट सायबर सिक्युरिटी परिषदेत गुरूवारी अॅपलतर्फे बग शोधण्यासाठीच्या बक्षीसाची घोषणा केली गेली. सुरवातीला २४ जणांना त्याची संधी दिली जाणार आहे. पाच पातळींवर हा कार्यक्रम होणार आहे.सिक्युअर बूट फर्मवेअर मध्ये असा बग शोधला गेला तर २ लाख डॉलर्स बक्षीस दिले जाईल. सिकयुअर बूटमुळेच आयओएस बेकायदा प्रोर्गॅमच्या सहाय्याने भेदणे आजपर्यंत शक्य झालेले नाही असे समजते.

Leave a Comment