नवी दिल्ली : देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी प्रयत्नात असतात. यासाठी ते नवनवीन क्लुप्त्या लढवतात. जनतेशी रेडिओवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. जनतेच्या तक्रारी, सूचना ऑनलाईन पद्धतीने थेट शासन दरबारी मांडण्यासाठी मंत्रालय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ पोर्टलच्या व्यासपीठावरुन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत.
आता मोदींचे ‘आपले सरकार’
सरकारी पोर्टलच्या दुसऱ्या वर्षीच्या निमित्ताने दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडीयमवर भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोबाइल धारकांना सरकारच्या वेबसाइटशी संलग्नित करण्यासाठी एक नवीन अॅप देखील मोदींच्या हस्ते लॉन्च करण्यात आले. कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. तसेच यावेळी ते पोर्टलचा नियमित वापरकर्त्यांशी देखील संवाद साधतील.