बीएमडब्ल्यूची स्पोर्टी ५२० डी भारतात लाँच

bmw
जर्मन कारमेकर बीएमडब्ल्यूने त्यांच्या एक्झिक्युटिव्ह सेदानला थोडा स्पोर्टी लूक देऊन बनविलेली ५२० डी कार भारतात लाँच केली आहे. या कारची भारतातील एक्स शोरूम किंमत ५४ लाख रूपये आहे. चेन्नईमधील प्रकल्पात ही कार बनविली गेली आहे. सध्या ती फक्त डिझेल इंजिन मॉडेलमध्येच उपलब्ध आहे. कारला १९९५ सीसीचे फोर सिलींडर डिझेल इंजिन टर्बोचार्जरसह दिले गेले आहे व ते ८स्पीड स्टेपट्राॅनिक ऑटोमॅटिकल ट्रान्समिशनशी जोडले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग घ्यायला या कारला ७.७ सेकंद लागतात व तिचा टॉप स्पीड आहे ताशी २३३ किमी.
bmw
या कारला डबल स्पोक डिझाईनसह १८ इंची अॅलॉय व्हील्स, पॉवरफुल एअर इनलेट, साईड स्कर्ट दिला असून त्यामुळे तिला स्पोर्टी लूक मिळाला आहे. कारला एलईडी अॅडाप्टिव्ह हेडलाईटस, इलेक्ट्रीकली अॅडजस्टीबल स्पोर्टस फ्रंटसीटस, मल्टी फंक्शन स्टिअरिंग व्हील, अॅल्युमिनियम हेक्झागॉन इंटिरियर ट्रीमस्ट्रीप अशी फिचर्स आहेत. अल्पाईन व्हाईट, मेडियेरियन ब्ल्यू, कार्बन ब्लॅक अशा रंगात ती उपलब्ध आहे. .

Leave a Comment