‘गूगल’चे ऑलिम्पिकसाठी खास ‘डूडल’

google
मुंबई – इंटरनेट सर्च इंजिन ‘गूगल’ कधी कधी आपल्या नावाच्या अक्षरांना वेगळ्या आकारात, नक्षीदारपणे मांडून आपले खास ‘डूडल’ तयार करते. त्या प्रसंगाला या डूडलमुळे एक वेगळे महत्व प्राप्त होते.

गुगलने यावेळी ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर एक अनोखे डूडल सादर केले आहे. प्रथमच व्हिडिओच्या स्वरुपात हे डूडल तयार करण्यात आले आहे. यामध्ये वेगवेगळी फळे धावणे, अडथळ्याच्या शर्यती पार करणे, उंच उडी, पोहणे, गोल्फ, फुटबॉल, टेनिस इत्यादी खेळ खेळताना दिसत आहेत. अतिशय रंजक असा हा व्हिडिओ डूडल आहे. गूगलच्या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. ऑलिम्पिकच्या मुहूर्तावर गूगलने फ्रुट गेम्स हा गेम अँड्रॉईड मोबाईल गेमवेड्या लोकांसाठी तयार केला असून तो आजपासून गूगल स्टोअरवर उपलब्ध आहे. त्या गेमच्या प्रसारासाठी मुख्यत्वे हा डूडल तयार केला आहे.

Leave a Comment