ओप्पो लॉन्च केला सेल्फीप्रेमींसाठी जबरदस्त स्मार्टफोन

oppo
मुंबई : आपला ओप्पो एफ१एस स्मार्टफोन चीनमधील स्मार्टफोन कंपनी ओप्पोने मुंबईमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची ११ ऑगस्टपासून विक्रीही सुरु होणार आहे. हा स्मार्टफोनची अमेझॉन आणि रिटेल स्टोअरवर विक्री सुरु होणार असून, या स्मार्टफोनची किंमत १७ हजार ९९० रुपये आहे.

या स्मार्टफोनचे उत्कृष्ट कॅमेरा हेच वैशिष्ट्य असून, हा सेल्फी फोकस्ड फोन आहे. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांना हा स्मार्टफोन नक्कीच उपयुक्त असा आहे. या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असून, यामध्ये १/३.१ इंच सेन्सर आणि एस/२.० अॅपरचर आहे. यामध्ये ब्युटिफाय ४.० अॅपही आहे. या अॅपच्या माध्यमातून सेल्फी एडिट केले जाऊ शकते. यामध्ये सेल्फी पॅनोरमा आणि स्क्रीन फ्लॅश फीचर्सचाही समावेश आहे. या स्मार्टफोनच्या होम बटनवर फिंगरप्रिंट सेन्सर असून, ओप्पोच्या माहितीनुसार, ०.२२ सेकंदात स्क्रीन अनलॉक केले जाऊ शकते.

Leave a Comment