५ कोटीला ‘रांझा’चा ऑनलाईन लिलाव

auction
शिमला – आपल्या गुणी बैलाच्या विक्रीसाठी हिमाचल प्रदेशातील एका शेतकऱ्याने सोशल साइटचा पर्याय निवडला असून हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील घोरी धाविरी गावातील नरेश सोनी नावाच्या एका शेतकऱ्याने आपल्या बैलाचा ऑनलाइन लिलाव करण्याचे ठरवले असून त्यासाठी त्याने फेसबुकचा आणि अन्य साइट्सचा पर्याय निवडला आहे. दोन ज्वेलरी दुकानांचा मालक असलेला नरेश आपल्या मुर्रा जातीच्या बैलाचा ऑनलाईन लिलाव करत आहे. ५ कोटी रुपये ही प्राथमिक किंमत त्यासाठी त्याने ठरवली आहे.

आपल्या बैलाचे वर्णन त्याने असे केले आहे – नाव हिमाचल रांझा, लांबी १३ फूट, उंची ५ फूट ८ इंच, वजन १००० किलो, रोजचा आहार-२.५ किलो सोयाबीन, २.५ किलो हरभरा, १० किलो गुरांचे खाद्य, १ किलो देसी घी आणि याच्या जोडीला भरपूर सफरचंद. बैल चमकदार दिसण्यासाठी त्याला दररोज २ किलो मोहरीच्या तेलाने मालिश केले जाते. हिमाचल रांझा अजूनपर्यंत कुंवारा आहे, ही त्याची खास बात आहे. त्याचा रोजचा खर्च सुमारे १५००० रुपये असल्याचे नरेश सांगतो. बैलाच्या वीर्यविक्रीपासून मोठे उत्पन्न मिळते. या बैलाला पंजाब आणि हरियानाहूनही ग्राहक येण्याची शक्‍यता तो बोलून दाखवतो. या लिलावासाठी स्थानिक राजकारणी, बिलासपूरचे आमदार बांबेर ठाकूर उपस्थित राहणार आहेत. हरियानाच्या युवराज नावाच्या मुर्रा जातीच्या बैलाला ९ कोटी रुपये किंमत मिळाली होती, मग हिमाचल रांझाला ५ कोटी रुपये मिळणे अवघड नाही असे नरेश सोनी म्हणतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *