११ हजारपेक्षा कमी किमतीचा आरडीपी थिनबुक लॅपटॉप लॉन्च

rdp
मुंबई : आपला थिनबुक अल्ट्रा स्लिम लॅपटॉप हैदराबादमधील आरडीपी कंपनीने लॉन्च केला असून या लॅपटॉपची किंमत जवळपास ९ हजार ९९९ रुपये आहे. हा देशातील सर्वात स्वस्त लॅपटॉप असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा या लॅपटॉपची स्क्रीन १४.१ इंचाची असून, हा लॅपटॉपला मायक्रोसॉफ्ट आणि इंटेलच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. १.४ किलो आरडीपी थिनबुकचे वजन असून, इंटेल एटम एक्स५ -झेड८३०० प्रोसेसर यामध्ये आहे. त्याचसोबत २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रोएसडीच्या सहाय्याने १२८ जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा आहे. १४.१ इंच एवढी स्क्रीन असलेल्या या लॅपटॉपचे रिझॉल्युशन १३६६×७६८ पिक्सेल आहे. १००००mAh क्षमतेची लीथियम-पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. या थिनबुकला हैदराबादमध्ये डिझाईन करण्यात आले असून, तैवानमध्ये बनवण्यात आले आहे.

Leave a Comment