व्हायरल फिव्हर : प्रतिबंधात्मक उपाय

fever
सध्या हवामानात बदल होत आहे. पावसाळा तर सुरू झाला आहेच पण तो आता ओसरायला लागून हिवाळ्याची चाहूल लागेल. एक ऋतू बदलून दुसरा ऋतू सुरू होण्याच्या संधीकाळात काही संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. विशेषतः लहान मुलांमध्ये अशा आजारांचा प्रसार वेगाने होत असतो. त्यापासून मुलांचा बचाव करण्यासाठी काही उपायांची गरज असते. या संधीकाळामध्ये व्हायरल फिव्हर म्हणजे ताप, थंडी आणि खोकला असा आजार होऊ शकतो. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज आहे. ते खालीलप्रमाणे

१. वाफ – लहान मुलांना सर्दी झाली आणि त्यांचे नाक चोंदले की श्‍वास घ्यायला त्रास सुरू होतो. त्यावर सोपा उपाय म्हणजे गरम पाण्याच्या वाफा श्‍वासातून आत घेणे. साधारण दहा ते पंधरा मिनिटे अशा वाफा घ्याव्यात आणि शक्य असल्यास वाफेसाठी वापरावयाच्या पाण्यात यूकॅलिप्टस ऑईल टाकावे. २. मध – दुसरा उपाय म्हणजे मधाचा वापर. आपले बाळ अगदीच लहान असेल तर त्याला दिवसभरातून चार-पाच वेळा मधाचे बोट चाटवणे हा चांगला उपाय आहे. पण मूल पाच वर्षापेक्षा मोठे असेल तर त्याला एक चमचा मध त्यामध्ये थोडी दालचिनीची पावडर टाकून तो मध प्यायला द्यावा. त्यामुळे सर्दी कमी होते आणि खोकला कमी होतो.

३. आळीव – आळीवाचे बी आणि तुळशीची पाने टाकलेले पाणी उकळावे आणि ते पाणी मुलाला प्यायला द्यावे. त्यामुळे कफाने दाटलेली छाती मोकळी होते आणि सर्दी कमी होते. ४. मालीश – लहान मुलांना विशेषतः दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मोहरीच्या तेलाने मसाज करावा. तो करताना त्यात थोडासा लसूण टाकावा. मसाज करताना छाती, मान, पाठ यांच्या मालीशकडे लक्ष द्यावे. तळहात आणि तळपाय यांना चांगला मसाज द्यावा.

५. पाणी – मुलांना भरपूर पाणी पिण्यास देणे. हे खोकल्यामध्ये आवश्यक असते. पाणी जर शुध्द असेल आणि फिल्टर्ड असेल तर त्या पाण्यामुळे घशात खवखव निर्माण करणार्‍या बॅक्टेरियांचे शरीरातले प्रमाण कमी होते आणि संसर्ग कमी होतो. ६. आपल्या पूर्वजांनी सांगितलेला मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचा उपाय हा सर्वाधिक उपयुक्त आहेच पण सर्दी, खोकला आणि पडसे झालेल्या लहान मुलांना झोपण्यापूर्वी गूळ आणि हळद टाकलेले दूध पाजणे सर्वाधिक गुणकारी ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment