मुंबई- देशातील सर्वात श्रीमंत व रिलायन्स उद्योगसमुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सतत ८ व्या वर्षीही पगारवाढ न घेण्याचा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षासाठीही त्यांना १५ कोटी रूपयेच वेतन म्हणून मिळाले आहेत. अर्थात उद्योगसमुहातील अन्य अधिकार्यांना मात्र पगारवाढ दिली गेली आहे. मुकेश यांनी उच्च पदावर असताना वेतन कमी घेऊन उच्चपदस्थांपुढे वैयक्तीक उदाहरण घालून दिल्याचे सांगितले जात आहे.
मुकेश अंबानींना पगारवाढ नाही
२००८-९ सालात मुकेश यांना वेतन, इतर भत्ते व कमिशन मिळून १५ कोटी रूपये मिळाले होते. यंदाच्या वर्षात त्यांच्यासाठी ३८.७५ कोटी रूपये वेतनासाठी मंजुरी दिली गेली होती मात्र मुकेश यांनी १५ कोटींच वेतनापोटी घेण्याचा निर्णय घेतला असे समजते. २०१५-१६ या सालात अंबानी यांना ४.१६ कोटी रूपये वेतन, ६० लाख रूपये इतर भत्ते व ७१ लाख रूपये सेवानिवृत्ती लाभ असे वेतन व ९.५३ कोटी रूपये नफ्यातील कमिशन पोटी मिळाले आहेत.