महिला दहीहंडी पथकाला शनिशिंगणापूरच्या विश्‍वस्तांचे आमंत्रण

govinda
शनिशिंगणापूर – महिलांना एकेकेळी शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश नाकारणाऱ्या शनिशिंगणापूरमध्ये महिलांच्या गोरखनाथ दहीहंडी पथकाला शनिशिंगणापूरच्या विश्‍वस्तांनी गोपाळकाल्यासाठी आमंत्रण दिले असून महाराष्ट्राची ही सांस्कृतिक परंपरा गोरखनाथ दहीहंडी पथकाने देशाच्या विविध भागांमध्ये पोहोचवली आहे. या पथकाने गोपाळकाल्याच्या दिवशी देशाच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये दहीहंडीचे सादरीकरण करीत महाराष्ट्राची संस्कृती पोहोचवली. मात्र या पथकाला यंदा शनिशिंगणापूरच्या विश्‍वस्तांकडूनच बोलावणे आले आहे. येथे महिलांनी येऊन दहीहंडी फोडावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

महिलांच्या आंदोलनाची पार्श्‍वभूमी शनिशिंगणापूरला असून या परिस्थितीत विश्‍वस्तांनी स्वतःहून आमच्या गोपिकांना दहीहंडी फोडण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आम्ही तिथे जाऊन दहीहंडी फोडण्याचे निश्‍चित केले असल्याचे गोरखनाथ दहीहंडी पथकाचे प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सांगितले.

Leave a Comment