भ्रष्टाचारात रेल्वेची आघाडी

suresh
दिल्ली – सरकारी संस्था, बँका, विविध मंत्रालयांबाबत गेल्या वर्षात दाखल झालेल्या भ्रष्टाचार तक्रारींत रेल्वे देशात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने ही यादी जाहीर केली आहे. त्यात रेल्वे आघाडीवर आहेच पण बँकाही मागे नाहीत. तसेच दिल्ली सरकारही याच पंक्तीत आहे असे दिसते आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार तक्रार यादीत रेल्वेविरोधात १२३९९, बँक कर्मचारी अधिकार्‍यांविरोधात ५३६३, दिल्ली सरकार कर्मचारी अधिकारी ५१३९ तक्रारी दाखल आहेत. संसदेत हा अहवाल नुकताच सादर केला गेला आहे. त्याचबरोबर वित्त मंत्रालयाविरोधात ४९८६, शहरी विकास मंत्रालय ३०७९, दूरसंचार मंत्रालय ३३७९ तक्रारी गेल्या वर्षभरात दाखल झाल्या. भ्रष्टाचार विरोधात दाखल झालेल्या एकूण ५६१०४ तक्रारींपैकी ३८१९२ तक्रारींचे निराकरण केले गेले आहे तर १७९१२ त्रकारींबाबत चौकशी सुरू आहे असेही समजते. भ्रष्टाचारात पेट्रोलियम, अन्नपुरवठा, प्रत्यक्ष कर बोर्ड, सीमा शुल्क, मानवविकास, आरोग्य व माहिती प्रसारण या मंत्रालयांतील कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.

Leave a Comment