बांकेबिहारींच्या महागड्या झुल्याचे दर्शन हरियाली तीजला मिळणार

hariyali
वृंदावनात रमणार्‍या बांकेबिहारी म्हणजेच कृष्ण कन्हैयासाठी बनविल्या गेलेल्या जगातील सर्वात महागड्या झुल्याचे म्हणजेच झोपाळ्याचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही हरियाली तीजला वृंदावनात भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. यंदा हरियाली तीज ५ ऑगस्ट रोजी येत असून वर्षातून या एकाच दिवशी बांकेबिहारींचा हा झुला भाविकांना पाहता येतो.

सोने आणि चांदीचा मुबलक वापर करून हा शिसवी झुला बनविला गेला आहे. त्यात १लाख तोळे चांदी, २ हजार तोळे सोन्याचा वापर केला गेला आहे. बांकेबिहारींच्या झुलोत्सवाची प्रथा संत शिरोमणी हरिदास यांनी सुरू केली होती मात्र तेव्हा हा झुला पानाफुलांनी सजविला जात असे. १९४२ साली कोलकाताच्या उद्योजक बेरीवाला परिवाराने हा रजतकनक जडीत झुला बनविण्याची सुरवात केली व सतत ५ वर्षे राबून कारागिरांनी तो तयार केला. त्यावर पानांफुलांची अ्तिशय सुंदर कारागिरी आहेच पण हत्ती, मोरही कोरले गेले आहेत. अतिविशाल आकाराचा हा झुला १३० सुट्या भागात ठेवता येतो व उत्सवादिवशी तो पुन्हा जोडला जातो.

या झुल्याची आजच्या भावाने किंमत काढली तर ती कोट्यावधी रूपये आहे. झुल्यावर बसलेल्या ठाकुरजींच्या दर्शनासाठी दरवर्षीच मोठी गर्दी होते. यंदाही बांकेबिहारी मंदिरात दुपारी ४ ते रात्री १२ पर्यंत हा उत्सव साजरा केला जात आहे.

Leave a Comment