इंडस ओएस घडविणार क्रांती

indus
शहरांपासून दूर अंतरावर असलेल्या गावांगावात नवी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम रंगत आणू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत. इंडस ओएस या नावाने आलेली ही स्वदेशी सिस्टीम भारतासह दुसर्‍या देशांतही लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी खास प्रयत्न केले जात आहेत. इंग्रजीचा गंध नसतानाही ही सिस्टीम विविध १२ प्रादेशिक भाषांतून वापरता येते हेच तिचे वैशिष्ठ आहे. मायक्रोमॅक्स मोबाईलवर ही सिस्टीम उपलब्ध आहे.

शहरी भागात स्मार्टफोनधारकांची संख्या प्रचंड असली तरी ग्रामीण भागात ती म्हणावी तितकी जास्त नाही.याचे मुख्य कारण म्हणजे अँड्राईड ओएस इंग्रजीतून आहे व भारताच्या ग्रामीण भागात इंग्रजी येणार्‍यांचे प्रमाण कमी असल्याने तेथे स्मार्टफोनचा वापर कमी केला जातो असे दिसून आले आहे. त्यासाठी इंडस ओएस अत्यंत महत्त्वाची ठरते आहे. भारत व जगाच्या अनेक देशात जेथे अजून अँड्राईड व अँड्राईड वन ओएस पोहोचलेली नाही तो भाग इंडसचे महत्त्वाचे मार्केट म्हणून टार्गेट केला जात आहे.

आज भारतात अँड्राईड स्मार्टफोनने बाजाराचा ८० टक्के हिस्सा व्यापला आहे तरीही इंडसला येथे मार्केट मिळते आहे. शहरात स्मार्टफोन बाजारपेठ विकास गती थोडी मंदावली आहे आणि ग्रामीण भागात स्मार्टफोन फारसे लोकप्रिय नाहीत. ही गरज ओळखूनच इंडस आली आहे. टेक्स टू स्पीच फिचर हे यातले महत्त्वाचे फिचर. म्हणजे स्मार्टफोनमध्ये बोला, तो फोनच तुमचे म्हणणे टाईप करेल यामुळे ही सिस्टीम वापरण्यासाठी अत्यंत सोपी आहे. येत्या पाच वर्षात ही सिस्टीम वापरणार्‍यांची संख्या ३० कोटींवर जाईल असा दावा केला जात आहे.

Leave a Comment