उत्तर प्रदेशात बांधले राम व रावणाचे एकत्र मंदिर

ravan-temple
ग्रेटर नोयडा – प्रभू श्रीरामचंद्र आणि लंकाधिश्‍वर रावण यांचे एकत्र मंदिर उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये बांधण्यात आले असून रावणाच्या मूर्तीची येत्या ११ ऑगस्ट रोजी स्थापना करण्यात येणार आहे. या मंदिरात लंकेश रावणासह राममंदिरही बांधले जाणार आहे. या दोन्ही मूर्तींची स्थापना ११ ऑगस्टला ग्रेटर नोएडामधील बिसरख धाममध्ये करण्यात येणार आहे. राम आणि रावणाचे एकच मंदिर असण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा मंदिर प्रशासनाने केला आहे.

गेल्या ५ वर्षांपासून या मंदिराचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष अशोकानंदजी महाराज यांनी दिली आहे. आता मूर्तींचे कामही पूर्ण झाल्यामुळे ११ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या मंदिरात गणपती, राम परिवार मंदिर, राधाकृष्ण मंदिर, दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर, शनि मंदिर, आदी मंदिरांचाही समावेश असेल. ऋषी विश्रवा यांच्या तपश्‍चर्येचे ठिकाण आणि रावणाच्या जन्मस्थानी रावणाचे हे भव्य मंदिर बांधले जाणार आहे.

Leave a Comment