एक लिटर इंधनात ११ हजार किमी धावणारी कार

tufast
जर्मनीच्या म्युनिख टेक्निकल विद्यापीठातील टीम ने ईएलआय १४ नावाची कार तयार केली असून ती एक लिटर इंधनात ११ हजार किमीचा प्रवास करू शकणार आहे. या कारची नोंद गिनिज बुकमध्येही घेतली गेली आहे. प्रत्यक्षात ही इलेक्ट्रीक कार आहे व जगातील ती सर्वात किफायतशीर कार ठरली आहे. ही कार १ सीटरच आहे व दोन वर्षांपूर्वीच ती सादर केली गेली होती मात्र त्यावेळी या कारला १ लिटरमध्ये इतका प्रवास करता आला नव्हता. त्यामुळे संशोधक टीमने त्यावर सतत दोन वर्षे प्रयत्न करून, कांही सुधारणा करून या कारचे मायलेज वाढविण्यात यश संपादन केले आहे.

अर्थात ही कार ११ हजार किमी चालविली गेलेली नाही मात्र तिच्यावर घेण्यात आलेल्या विविध चाचण्यांतून ही कार १ लिटर पेट्रोलमधून जेवढी उर्जा निर्माण होते त्यात ११ हजार किमीचा प्रवास करू शकते हे सिद्ध झाले आहे. या कारमधील चालकाला झोपूनच कार चालवावी लागते. त्यासाठी चालकाला मदत म्हणून अॅल्युनिनियम स्टीअरिंग आर्म, रियर व्ह्यू कॅमेरा, कम्युनिकेशन फॅसिलीटी,रियल टाईम ब्रॉडकास्ट सुविधा, मॅकेनिकल डिस्क ब्रेकस अशी आवश्यक फिचर्स वापरता येणार आहेत. ही कार तीन चाकी आहे. हवेचा प्रतिबंध कमी व्हावा म्हणून कारची उंची अगदीच कमी आहे व ती कार्बन फायबर प्लॅस्टीकपासून बनविली गेली आहे. कारला थ्रीडी फ्रंट विंडो दिली गेली आहे. या कारचा ताशी वेग आहे ३० किलोमीटर.

Leave a Comment