‘अवरमाइन‘ हॅक केले ‘पोकेमन गो’च्या सीईओचे ट्विटर खाते !

pokomen
क्‍योटो (जपान) – ‘अवरमाइन‘ नावाच्या एका समूहाने ‘पोकेमन गो‘ या अनोख्या मोबाईल गेममुळे चर्चेत आलेल्या निंतेंदो या जपानी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन हन्के यांचे ट्विटर खाते हॅक केल्याचे वृत्त समोर आले आहे.

हॅक झाल्यानंतर त्यांच्या अकाऊंटवरून #अवरमाइन नावाने ट्‌विटस करण्यात येत आहेत. तसेच त्यांचा पासवर्ड ‘No Pass‘ असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘पोकेमॉन गो‘चा अधिकृत प्रतिनिधी जोपर्यंत हॅकर्सच्या समूहाला संपर्क करणार नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले थांबणार नसल्याचा इशाराही या हॅकर्सनी दिला आहे. यापूर्वी पोकेमॉन गो गेमचा लॉग इन सर्व्हर हॅक झाल्यामुळे हा गेम खेळण्यासाठी उत्सुक अनेक जण नाराज झाले होते. यावर निंतेंदोच्या वतीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Leave a Comment