बहुगुणी थ्रीडी रोबो तयार

3dirobo
इस्त्रायलच्या वैज्ञानिकांनी लहरीप्रमाणे पुढे मागे होऊ शकणारा, तरंगू शकणारा, पोहू शकणारा, उंच चढावर चढू शकणारा तसेच कोणत्याही प्रकारच्या जमिनींवर रांगू शकणारा थ्रीडी रोबो तयार करण्यात यश मिळविले आहे. इस्त्रायलच्या बेन गुरियन युनिव्हर्सिटी ऑप नेगेव मधील संशोधकांच्या पथकाने या संदर्भातली माहिती दिली आहे. सॉ असे या रोबोचे नामकरण केले गेले आहे.

प्रमुख संशोधक डेव्हीड जारूक या संदर्भात माहिती देताना म्हणाले जगात रोबोना तरंगाप्रमाणे गती देण्यासाठीचे संशोधन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मात्र आम्ही त्यात यशस्वी झालो आहोत. आमचा रोबो वाळवंट, गवती भागात तसेच खडकाळ व जल भागातही न थांबता त्याची मार्गक्रमणा करू शकतो. तो पोहू शकतो, रांगू शकतो, उंच भागात चढू शकतो व तरंगांप्रमाणे मागेपुढे होऊ शकतो. याचा वापर वैद्यकीय उपचार, सुरक्षा, शोध या क्षेत्रात होऊ शकणार आहे. हा रोबो सेंकंदाला ५७ सेंमी अंतर कापू शकतो. हा वेग सध्याच्या रोबोंपेक्षा पाचपट अधिक आहे. हा रोबो वेगवेगळे आकारही घेऊ शकतो.

Leave a Comment