इंटेक्सचा जबरदस्त फीचर्सवाला स्मार्टफोन लाँच

intex
नवी दिल्लीः आपला नवा फोन इंटेक्स अॅक्वा स्ट्राँग ५.१ इंटेक्सने वेबसाईटवर लिस्ट केला असून या फोनची किंमत ५ हजार ५९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन सध्या इंटेक्सच्या वेबसाईटवर लाँच करण्यात आला आहे. मात्र खुल्या बाजारात हा फोन ग्राहकांसाठी कधी उपलब्ध होईल, याबद्दल कसलीही माहिती देण्यात आली नाही.

कमी किंमतीत जास्त फीचर्स देणारा इंटेक्स अॅक्वा हा फोन असल्याचे सांगितले जात आहे. या फोनची बॅटरी क्षमता देखील जबरदस्त आहे. शिवाय कनेक्टीव्हिटीसाठी ब्ल्यूटूथ, वायफाय असे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन 3 रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ५ इंच आकाराची स्क्रीन, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल स्टोरेज, अँड्रॉईड ६.० मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टम आणि ड्युअल एलईडी फ्लॅशसह ५/२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment