भारतात ही पासपोर्ट होताहेत स्मार्ट

pass
भारतात लवकरच ई पासपोर्ट जारी केले जाणार आहेत. मोबाईल फोन प्रमाणे एक चिप असलेले हे पासपोर्ट सुरक्षित समजले जातात. यात असलेल्या चिपवर होल्डरचा डिजिटल सिग्नेचर डेटा, नाव, नागरिकत्व, पासपोर्ट नंबरसह सर्व माहिती असते. या पासपोर्टचे सिक्युरिटी फिचर्स वाढविण्याचे काम सरकार सध्या करत आहे. ते पूर्ण होताच हे पासपोर्ट जारी केले जातील असे समजते.

या पार्सपोर्टमध्ये पासपोर्ट पेजवरच्या सर्व माहितीचा डेटा सेफ राहतो. यात होल्डरचा चेहरा व डोळे तसेच फिंगरप्रिटही असतात यामुळे बनावट पासपोर्टला आळा घालता येतो तसेच पासपोर्टचा गैरवापर होऊ शकत नाही. तसेच यामुळे प्रवाशाचे नागरिकत्व सहज व्हेरिफाय करता येते. दिसायला हे पासपोर्ट नेहमीच्या पासपोर्टप्रमाणेच आहेत. त्यात फ्रंट पेजवर चिप, फ्रंट कव्हरवर बायोमेट्रीक सिंबॉल, वॉटरमार्क असेल. हे पासपोर्ट तयार करण्यासाठीची मशिनरी खरेदी करण्याची प्रोसेस सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

युनायटेड नेशन्समधील १९३ पैकी ९६ देशात असे पासपोर्ट दिले जातात. न्यूझीलंड, अमेरिका, युरोपियन युनियन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, जपानमध्येही बायोमेट्रीक पासपोर्ट दिले जातात.

Leave a Comment