मुंबई – व्होडाफोन नेटवर्क गेल्या कित्येक दिवसांपासून अगदी खराब झाले असल्याची तक्रार सगळ्याच व्होडाफोन ग्राहकांकडून होत असताना. ग्राहकांना व्होडाफोन कंपनीने नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. व्होडाफोन कंपनीने इंटरनेट डेटा ऑफरमध्ये बदल केले असून आयडिया आणि एअरटेलनंतर आता व्होडोफोन कंपनीही या स्पर्धेत उतरली आहे.
व्होडाफोनच्या इंटरनेट डेटा ऑफरमध्ये बदल
आता तेवढ्याच पैशांच्या पॅकमध्ये व्होडाफोनच्या ग्राहकांना जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे. हा इंटरनेट डेटा ५० टक्के ते ६७ टक्के एवढा जास्त असणार आहे. ६५० रुपयांच्या ३जी/४जी इंटरनेट पॅकमध्ये आता ५जीबी डेटा मिळणार आहे. याआधी याच किंमतीमध्ये ग्राहकांना ३जीबी डेटा मिळत होता. ४९९ रुपयांच्या ३जी/४जी इंटरनेट पॅकमध्ये आता २ जीबी ऐवजी ३ जीबी डेटा मिळेल. ९९९च्या ३जी/४जी इंटरनेट पॅकमध्ये ग्राहकांना १० GB डेटा मिळणार आहे.
त्याचपद्धतीने ४४९ रूपयांमध्ये व्होडाफोनची ३जी/४जीच्या ऑफर्समध्ये ५०% अधिक डेटा मिळणार आहे. याबाबत व्होडाफोनने सांगितले आहे की, या ऑफर्समुळे ग्राहकांना अधिक इंटरनेट सेवा मिळणार आहे. आयडिया आणि एअरटेल यांच्यानंतर आता व्होडाफोन कंपनी या स्पर्धेत उतरली आहे.
Awesome…