थायलंडमध्ये चक्क कंडोमचे म्युझियम

condom
सध्याच्या काळात लज्जा हा शब्द तसा दुर्मिळच झाल्यामुळे तुम्ही कितीही सोज्वळपणाचा आव आणला तरी, ‘त्या’वेळी तुम्ही सर्व काही विसरून कंडोम आणण्यासाठी जाताच. कारण सुरक्षित लैंगिक संबंध ही काळाची गरज आहे. तुम्हाला आज आम्ही कडोमच्या अशा एका ठिकाणाबद्धल सांगणार आहोत, जेथे तुम्हाला जगभरातले सर्व प्रकारचे कंडोम पहायला मिळतील.
condom1
आपल्या आगळ्या वेगळ्या सौंदर्याबद्धल जगभरात थायलंड प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे जगभरातील लाखो पर्यटक हजेरी लावून जातात. पण तुम्हाला माहित आहे का, थायलंडमध्ये सर्वात जास्त उत्पादन कशाचे घेतले जाते. थायलंडमध्ये सर्वात जास्त उत्पादन हे कंडोमचे घेतले जाते. महत्वाचे म्हणजे थायलंड आरोग्य मंत्रालयाने सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळेच थायलंडमध्ये कंडोमचे म्युझियम उभारण्यात आले आहे.
condom2
येथे मशिनच्या सहाय्याने कंडोमचा मजबूतपणा आणि गुणवत्ता तपासली जाते.कंडोमची गुणवत्ता आणि मजबूतपणा पाहण्यासाठी कंडोममध्ये पाणी भरले जाते. या म्युझियममध्ये कंडोम आणि सेक्स संबंधी काही घोषवाक्ये लिहिलेल्या फलकही लावण्यात आले आहे. ‘Don’t be silly’ ‘cover that willy’ ‘Slip it on before you sleep it in’ आणि ‘Smart girls carry condoms’ अशा प्रकारची घोषवाक्या म्युझियमची शान वाढवतात. वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत कंडोम सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. अल्पावधीतच हे म्युझियम प्रेक्षकांच्या पसंतीचे एक महत्वाचे ठिकाण बनले आहे.

Leave a Comment