स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल

petrol
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली असून पेट्रोल १ रूपया ४२ पैसे प्रतिलीटर तर, डिझेल प्रतिलीटर २ रूपये १० पैशांनी स्वस्त मिळेल. नवे दर सोमवारी मध्यरात्रीपासून लागू होतील.

कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरल्यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरल्या आहेत. दर १५ दिवसांनी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेतात. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे असलेले दर आणि घरगुती (किरकोळ) पातळीवर असलेले तेलाचे दर यांबाबत चर्चा केली जोते. या आढाव्यानंतरच दरात कपात किंवा वाढ करण्याबाबत निर्णय़ घेण्यात येतो.

तेल कंपन्या १५ दिवसातून एकदा पेट्रोल व डिझेलच्या किमतीची समीक्षा करतात, ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर आणि घरगुती पातळीवरील चलन विनिमय दर विचारात घेण्यात येत असतो. याच आधारावर इंधनदरात कपात व वाढ याबाबत निर्णय घेण्यात येतो.

Leave a Comment