डायमंड फेशियलचा अनुभव नककीच घ्यायला हवा

diamond
हिर्‍यांचे दागिने हा तमाम महिला वर्गाचा विकपॉईट समजला जातो. अर्थात हिरे हे केवळ दागिन्यातच चमकतात असे नाही तर आपल्या त्वचेलाही ते हिर्‍याची झळाळी देऊ शकतात. त्यासाठीच करायला हवे डायमंड फेशियल. डायमंड फेशियल हा त्वचेला झळाळीच नव्हे तर तरूणपणा देणारा प्रभावी उपचार आहे. मृत व कोरड्या त्वचेसाठी हे फेशियल अत्यंत उपयुक्त असून कोणत्याही वयाच्या महिला त्याचा सहज वापरू शकतात. जगभरात आज डायमंड फेशियल केले जाते. त्याचे अनेक फायदेही आहेत.

त्वचेवरील मृत पेशी काढून त्वचेला नवझळाली याच्यामुळे मिळते. तसेच अनियमित दिनचर्चा, वेळी अवेळी खाणे, ताण, चिंता यांच्यामुळे कमी वयातच त्वचा निस्तेज दिसू लागते त्यावरही हे फेशियल अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेत साठलेली टॉक्सिक्स काढून टाकण्यात हे फेशियल मदतगार आहे. यामुळे त्वचेच्या पेशी अॅक्टीव्ह बनतात, त्वचेची चयापचय क्रिया वाढते व सैल पडलेली त्वचा आवळली जाऊन डागरहित व तजेलदार दिसते.

उन्हामुळे त्वचेवर आलेला टॅन तसेच ब्लॅकहेडस चा नाश करण्यासाठीही हे फेशियल अतिशय उपयुक्त आहे. एकदा हे फेशियल केले की महिलांमधील आत्मविश्वास वाढतो व आपण स्पेशल असल्याची भावना निर्माण होते.या फेशियलमुळे आतूनच एकप्रकारची शांतता मिळते व त्याचा परिणाम त्वचा तजेलदार दिसण्यात होतो. विचार चांगले असतील व मनस्थिती उत्तम असेल तर त्वचा चमकतेच.

विशेष म्हणजे हे फेशियल घरच्याघरीही करता येते. त्याची कीट बाजारात मिळतात. त्वचा स्वच्छ करण्यासाठी फुलांचे अर्क, तेल, वॉलनट सह हिरे भस्म असलेले डायमंड स्क्रब, त्वचा मुलायम बनविणारे डायमंड डिटॉक्सिफाइंग लोशन ,अँटी एजिंग डायमंड मसाज जेल व टॅनिंग दूर करणारे डायमंड फेस मास्क यांचा समावेश आहे.

Leave a Comment