जगातील सर्वात जुनी बँक मरणपंथाला

monte
जगातली सर्वात जुनी व अजूनही कार्यरत असलेली इटालीची माँटे डाय पास्की डी सिएना ही बँक बंद होण्याच्या मार्गावर असून ती इटालीतील तीन नंबरची कमर्शियल बँक आहे. युरोपातील आर्थिक मंदीची मोठी झळ या बँकेला सोसावी लागली आहे व त्यामुळे ती मरणपंथाला लागली असल्याचे समजते.युरोपियन बँकींग अॅथॉरिटीने युरोपातील ५१ मोठ्या बँकांसाठी नुकतीच स्ट्रेस टेस्ट घेतली तेव्हा माँटे डाय पास्कीचे फार थोडे दिवस राहिले असल्याचे दिसून आले आहे. या संस्थेच्या अंदाजानुसार २०१८ पर्यंत या बँकेचे कॅपिटल बफर संपुष्टात येईल व ती बंद होईल.

या बँकेची स्थापना १४७२ साली इटलीतील सिएना शहरात एका मॅजिस्ट्रेटने केली होती. ही बँक आजतागायत सुरू आहे. जगातील ही पहिली बँक मानली जाते. मात्र गेली सहा वर्षे युरोझोनचे आर्थिक संकट असल्याने अनेक मोठ्या बँकांना त्याची मोठी झळ बसली आहे. माँटे डाय पास्कीचा सध्याचा कॅपिटल बफर १२.१ टक्का आहे मात्र तो २०१८ पर्यंत उणे २.२ वर जाईल असे आढळले आहे. अर्थात युरोपियन युनियन मध्ये घटत चाललेल्या जीडीपीमुळे बँकेवर जी दुरावस्था ओढविली आहे ती लपून राहिलेली नाही. बँकेचे ९.२ अब्ज युरो बॅड लोन मध्ये रूपांतरीत झाले आहेत यामुळे निर्माण झालेली आव्हाने बँक पेलू शकलेली नाही असे समजते.

Leave a Comment