गुन्हेगार शोधण्यासाठी पोकेमॉन गोची मदत?

pokgo
पोकेमॉन गो या गेममुळे जनता किती पागल होत आहे याच्या बातम्या दररोज झळकत असतानाच आता अमेरिकन पोलिसही पोकेमॉनच्या दिवान्यांत सामील झाले असल्याचे कळते. अर्थात अमेरिकन पोलिस पोकॅमॉनच्या प्रेमात पडण्याचे कारण थोडे वेगळे आहे. हे पोलिस वाँटेड गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोकेमॉनची मदत घेत आहेत.

व्हर्जिनियातील स्मिथफिल्ड पोलिस विभागाने पोकेमॉन योजना तयार केली आहे. ही योजना फेसबुक पेजवरही दिली गेली आहे. पोलिस स्टेशनच्या प्रोसेसिंग रूममध्ये डिट्टो पोकेमॉन म्हणजे पोकेमॉनची प्रतिमा वाँटेड गुन्हेगारांच्या नावांच्या यादीत लावली गेली आहे. याचा उद्देश पोकेमॉन खेळणार्‍या नागरिकांना जोडून घेऊन त्यांचा वापर गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी करायचा असा आहे. अर्थात या पद्धतीने अजून एकही गुन्हेगार पकडला गेलेला नाही हे सत्य असले तरी एक गुन्हेगार पोकेमॉन खेळण्याच्या नादात चक्क पोलिस स्टेशनमध्येच आला व त्याला त्वरीत अटक केली गेली असल्याचेही पोलिस सांगत आहेत.

Leave a Comment