लॉस एंजेलिस – शनिवारी अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये ४२ वर्षीय ल्यूक अॅकिन्स यांनी विमानातून विना पॅराशूट उडी घेत विश्वविक्रम रचला असून २५ हजार फूट उंचावरून उडी घेऊन ल्यूक यांनी आपल्या नावे नवा विक्रम केला आहे.
२५ हजार फुट उंचीवरून विना पॅराशूट उडी घेऊन रचला विश्वविक्रम !
त्यांनी ही विश्व विक्रमी स्कायडाय लॉस एंजेलिस पासून ३० मैल दूर असलेल्या सिमी व्हॅलीत केली. ल्यूकच्या या पराक्रमाला कॅमेरेत कैद करण्यासाठी त्यांच्याबरोबर इतर तीन लोकांनीही उडी घेतली होती. ल्यूकसाठी खाली १०० चौरस फुटांची जाळी लावण्यात आली होती. त्यांचा हा विक्रम पाहण्यासाठी त्यांची पत्नी मोनिका आणि चार वर्षाचा मुलगा उपस्थित होते. ते वयाच्या बाराव्या वर्षापासून स्कायडाईग करत असून त्यांनी आतापर्यंत आठ हजार वेळा स्कायडाईग केले आहे. ल्यूकच्या म्हणण्यानुसार पॅराशूटचा वापर केल्यामुळे उडी मारण्याची जागा चुकू शकते. त्यामुळे त्याने पॅराशूटशिवाय उडी मारण्याचा निर्णय घेतला.