बोअरिंग सहजीवनात या उपायांनी फुंका प्राण

boring
आजकाल लग्नाचे वय पुढे गेले आहेच पण त्याचबरोबर करियर, हवे तसे घर, सेव्हींग यासाठी मूल जन्माला घालण्याचा विचारही लगेच केला जात नाही. काही दिवसांतच सुखसुविधा मिळविण्याच्या नादात कामात सतत गुंतल्याने लग्नानंतरचे आयुष्य लवकरच कंटाळवाणे किवा बोअरिंग होत असल्याचा अनुभवही जोडपी घेत आहेत. मात्र थोडा विचार आणि प्रयत्न केला तर हे बोअरिंगपण सहज दूर ठेवता येणे शक्य होते व सहजीवनाचा मनमुराद आनंदही लुटता येतो.

आजची मुख्य समस्या म्हणजे मुले मुली दोघेही करिअरिस्ट असल्याने एकमेकांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. जोडीदाराबरोबर जिवाभावाच्या चार गोष्टी बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. त्यामुळे चर्चा करून सुटू शकणारे प्रश्न तसेच लोंबकळत राहतात व आयुष्य कंटाळवाणे होऊ लागते. यासाठी कांही पथ्ये आवर्जून पाळा

उदाहरण द्यायचे तर जोडीदारात कांही दोष असणारच पण वारंवार त्याचाच उल्लेख करण्यापेक्षा त्याच्यातील गुणांचा आवर्जून उल्लेख करा. त्याचे कौतुक करा. यामुळे गप्पा मारताना रंगाचा बेरंग होणार नाही. भांडणाचे कारण कोणतेही अ्रसो व कुणाच्याही वागण्यामुळे भांडणाची वेळ आली असली तरी एकमेकांना माफ करायला शिका. जुन्या गोष्टींवर पडदा टाका व पुढच्या प्लॅनिगचा विचार करा. लग्नानंतर अतिपरिचय होतोय व त्याचा परिणाम अवज्ञा किवा एकमेकांची दखल न घेण्यातही होतो परिणामी नातेसंबंधात तणाव येतात. आपले नाते मजबूत राहावे यासाठी जोडीदाराच्या गरजांची कदर करा.

boring1
कांही कारणाने भांडण झाले असले तर कोणताही मोठा निर्णय त्यावेळी घेऊ नका. रागाच्या भरात घेतलेले निर्णय बरेचदा नुकसानकारक ठरतात हे लक्षात ठेवा. व्यस्त दिनक्रमातही स्वतःचे आत्मनिरीक्षण करा त्याचीही खूप मदत होते. नाते चांगले राखण्यासाठी जोडीदाराच्या अडचणी चर्चेने सोडवा अर्थात अशावेळी जास्त सहानभूती नकोच हेही लक्षात ठेवा. पावसाळ्यात रोमान्स पॅकेज जरूर घ्या. त्यानेही आयुष्यात नवा उत्साह येतो. बरेचदा कमी पैसा हे नातेसंबंध बिघडण्यामागचे कारण असते. अशावेळी आपली बचत पाहून भविष्यातील योजना आखा.

एखादे खास जेवण मुद्दाम ठरवा. त्यावेळी रोमॅटिक गाण्यांची मेजवानीही असू द्या. असे हलकेफुलके क्षण जाणीवपूर्वक आणा. त्याने मन आनंदी होईल व ताणतणाव कांही काळ नक्कीच दूर राहतील.

Leave a Comment