धर्म सोडणा-यांमध्ये महाराष्ट्र अव्वल

indian
नवी दिल्ली – भारतात नास्तिकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचा प्यू रिसर्च सेंटरचा दावा २०११ च्या जनगणनेच्या अहवालाने खोटा ठरविला असून २०११ च्या जनगणनेच्या नव्या आकडेवारीनुसार भारताच्या १२० कोटीपेक्षा अधिक लोकसंख्येत फक्त ३३००० जण स्वतःला नास्तिक मानतात, म्हणजेच देशात सध्या फक्त ०.००२७ टक्के जनता नास्तिक आहे.

नास्तिकांमध्ये ५० टक्के प्रमाण महिलांचे आहे. याशिवाय गावातील लोक शहराच्या लोकांच्या तुलनेत धर्म सोडून नास्तिक बनण्यात पुढे आहेत. पहिल्यांदाच कोणत्याही जनगणनेत नास्तिकांचे आकडे सार्वजनिक करण्यात आले, याआधी नास्तिकांना नगण्य मानले जात होते.
महाराष्ट्र नास्तिक लोकांच्या प्रकरणी सर्वात पुढे आहे. येथे ९६५२ लोकांनी स्वतःला नास्तिक घोषित केले आहे. दुस-या क्रमांकावर मेघालय (९०८९) आणि तिस-या स्थानी केरळ (४८९६) आहे. पश्चिम बंगाल सारख्या कम्युनिस्ट सरकारांचा इतिहास असणाऱया राज्यात फक्त ७८४ लोकांनी स्वतःला नास्तिक म्हणविले.

याच्या दाव्यानुसार नास्तिकता जगाचा तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. भारतात जगाच्या एकूण नास्तिकांची तिसरी सर्वात मोठी संख्या असल्याचा दावा प्यू रिसर्चने केला होता. अहवालात भारतात नास्तिकांची संख्या ७ लाखांपेक्षाही अधिक म्हटली गेली होती.

Leave a Comment