जनरल मोटर्स भारतातील गुंतवणुकीचा पुर्नविचार करणार

ford
जनरल मोटर्सने भारतात १०० कोटी डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली असली तरी या गुंतवणुकीबाबत कंपनी पुनर्विचार करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ही गुंतवणुक सध्या तरी स्थगित केली गेली असल्याचेही समजते.कंपनी आपल्या या योजनेची पुन्हा तपासणी करून मगच त्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जनरल मोटर्सच्या विक्रीत भारतात ४० टक्के घट झाली आहे व त्यांचा भारतीय प्रवासी वाहन बाजारातील हिस्साही घसरला आहे. त्यातच सध्या भारतात डिझेल वाहनांबाबत जे नवे नियम लागू केले गेले आहेत त्याचाही फटका कंपनीला बसरणार आहे. भारतात दररोज सरसरी ५ हजार कार्स खपतात व २०२० पर्यंत भारत जगातील तीन क्रमांकाचा वाहन बाजार असेल असे अंदाज वर्तविले गेल्याने जनरल मोटर्सने २०१५ मध्ये भारतात १०० कोटी डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली होती. मात्र भारतीय कार बाजारावर वर्चस्व मिळविणे सहज सोपे नसल्याचे कंपनीच्या अनुभवास येत आहे. गेली २० वर्षे कंपनी सातत्याने नुकसानीलाच सामोरी जात आहे.

तज्ञांच्या मते भारतीय ग्राहकांची पसंती नेहमीच पैसा वसूल गाड्यांना मिळाली आहे. त्यांना चांगले मायलेज देणारी, सहज सेवा मिळणारी व रिसेलमध्येही चांगली किंमत देणारी कार पसंत असते व त्या दृष्टीने जनरल मोटर्सने कधी विचारच केलेला नाही. त्यामुळे या अपेक्षा पूर्ण करणार्‍या हुयंदाई व मारूतीला भारतात अधिक पसंती दिली जाते.

Leave a Comment