शार्पचा फिजिकल बटण्ससह नवा बेसियो २ स्मार्टफोन

basio2
जपानची हँडसेट मेकर कंपनी शार्पने त्यांचा नवा स्मार्टफोन बेसियो २ नावाने जपानी बाजारपेठेत सादर केला आहे. विशेष म्हणजे या अँड्राईड स्मार्टफोनमध्ये कॉल, होम व मेसेजसाठी फिजिकल्स बटण दिली गेली आहेत. या प्रकारचा हा पहिलाच स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. यामध्ये सिनियर सिटिझन्सना येणार्‍या अडचणींचा विचार केला गेला आहे. त्यांच्यासाठीच खास स्क्रीन मध्येही क्लिक बटण दिले गेल्याचे सांगितले जात आहे.

कंपनी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या क्लिक बटण्समुळे डायलर व मेसेजिंग अॅप्स त्वरीत उघडतात व क्विक बटणामुळे फेवरिट नंबर्स व कॉन्टॅक्टसाठी असाईन करता येते. गडद निळा, गडद लाल व गोल्ड कलरमध्ये हा फोन सादर केला गेला आहे. पाच ऑगस्टपासून तो विक्रीसाठी उपलब्ध असेल.

फोनच्या अन्य फिचर्समध्ये ५ इंची एचडी डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास फोर प्रोटेक्शनसह आहे. अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, २ जीबी रॅम, इंटरनल मेमरी १६ जीबी, ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने वाढविण्याची सुविधा, १३ एमपीचा रियर कॅमेरा त्याला प्रोटेक्शनसाठी स्लायडिंग कव्हर, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा व कनेक्टीव्हीटीसाठी फोरजी, वायफाय, एलटीई, ब्ल्यू टूथ, मायक्रो यूएसबी यांचा समावेश आहे. जपानबाहेर हा फोन कधी मिळणार याची माहिती अद्यापी दिली गेलेली नाही.

Leave a Comment