येत्या ४०-५० वर्षासाठी वैष्णोदेवी मंदिराचा मास्टर प्लान

vaishno-devi
नवी दिल्‍ली – येत्या ४०-५० वर्षांसाठी एक मास्टर प्लान जम्मू कश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील माता वैष्णोदेवी गुफा मंदिराच्या क्षेत्रात बनविण्यात येणार असून जम्मू कश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोऱ्हा यांनी दिल्लीत झालेल्या ५८ व्या बैठकीत हा निर्णय घेतला असून, ते श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाचे अध्यक्ष देखील आहे.

वोऱ्हा यांनी या बैठकीत एक मास्टर प्लान तयार करण्याच्या गरजेवर भर दिला. कारण, भाविकांना पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधांची क्षमता निश्चित करण्यासाठी आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून याचा विचार करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. एन. एन. वोऱ्हा म्हणाले, पर्यावरणाला सुरक्षित ठेवणे आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यात्रेच्या सर्वच गोष्टी नियोजनबद्ध करणे, खूपच महत्वाचे झाले आहे. तसेच कचरा संकलनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर आणि प्रभावी वापर करण्यात यावा.

Leave a Comment