डिलीट होत नाही आयओएसवरील व्हॉटसअॅप डेटा

whatsapp
नवी दिल्ली – ‘आयओएस‘चे सुरक्षातज्ज्ञ जॉनाथन झिझारस्की यांनी आयओएस या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉटसअॅपवरील डिलीट केलेला डेटा डिलीट होत नसल्याची माहिती ब्लॉगद्वारे माहिती दिली आहे.

विविध पद्धतींचा अवलंब व्हॉटसअॅपद्वारे युजर्सच्या माहितीच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर झिझारस्की यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, मी हे तपासण्यासाठी व्हॉटसअॅप इन्स्टॉल केले. काही वेळ चॅटिंग केले. नंतर मी काही चॅट डिलीट केले. नंतर व्हॉटसअॅपवरील क्‍लिअर ऑल चॅटस केल्यानंतर मी बॅकअप घेतला. मात्र डिलीट केलेला डेटा बॅकअपमध्ये तसाच होता. तसेच हा सारा प्रकार व्हॉटसअॅप कोणत्याही हेतुसाठी करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. व्हॉटअॅपच्या बाबतीतील हा प्रकार केवळ आयओएस अॅप्सलाच येत असल्याने काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment