आरबीआयच्या गव्हर्नर पदावर सस्पेंस कायम ?

rbi
नवी दिल्ली : रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नर पदाचा रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपत असून, सरकारला त्या जागी अद्यापही नवा चेहरा सापडला नाही. नव्या चेहऱ्याबाबत सस्पेन्स कायम असतानाच संभाव्य चेऱ्यांमध्ये आणखी नव्या नावांची भर पडत असल्यामुळे पुन्हा उत्सूकता वाढत आहे. दरम्यान, या पदासाठी भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या संचालिका अरुंधती भट्टाचार्य यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे गव्हर्नर पदावर महिला राज येणार का याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, अरूंधती भट्टाचार्य यांनी मात्र स्वत: या वृत्ताचे खंडन केले आहे. तरेच, या चर्चेवर प्रतिक्रिया देणे सध्यातरी टाळले आहे. मात्र, जेव्हा स्वत: भट्टाचार्य यांनाच प्रसारमाध्यमांनी विचारले असता प्रसारमाध्यमांवर काहीसा राग व्यक्त करत त्या म्हणाल्या, मी कोणत्याही प्रकारे यासाठी लॉबिंग करत नाही. तुम्ही पत्रकारच यासंबंधीचे कयास बांधत आहात. या मुद्द्यावर मी कोणती प्रतिक्रिया देणार नाही.

दरम्यान, विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ ४ सप्टेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे राजन यांचा उत्तराधीकारी कोण याबाबत चर्चेला उत आला आङे. भट्टाचार्य यांच्यासोबतच आणखी काही नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये आर्थिक विषयावरील सचिव शक्तिकांत दास, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्यूटी गव्हर्नर उर्जित पटेल आदींच्या नावाचीही चर्चा आहे. गव्हर्नरपदाच्या नावावर अर्थमंत्र्यांच्या सहमतीते पंतप्रधान शिक्कामोर्तब करतात. त्यामुळे चर्चा काहीही असली तरी, अर्थमंत्री अरूण जेटली आणि मोदी यांच्या मनात जे नाव असेल त्यांवरच शिक्कामोर्तब होणार हे नक्की.

Leave a Comment